राजन तेली यांचे आवाहन:भाजपा महाराष्ट्र प्रदेश देणार ऑनलाईन प्रशिक्षण…
⚡सावंतवाडी ता.१४-: शासनाकडून ‘तलाठी’ पदासाठी मेगा भरती जाहीर झालेली असून त्याद्वारे लवकरच 4644 पदे भरण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज दाखल करावेत.अश्या इच्छुक उमेदवारांसाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
दरम्यान या भरती प्रक्रियेसाठी 17 जुलै ही अंतिम तारीख आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, यासंबंधीची लिंक लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल .
