श्रीलोचन बाल विकास केंद्र पुणे येथे सिंक्रो डिजिटल या कंपनीकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप...
⚡बांदा ता.१४-: पुणे हे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते, बरेच परदेशी आणि आंतरदेशीय विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुण्यात येतात कारण या स्पर्धेच्या काळात टिकण्यासाठी विविध विषयांचे ज्ञान मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. आपण सातत्यपूर्ण अभ्यास करायला हवा. आपण जरी गरीब कुटुंबातून आलो असलो तरी शिक्षणाने असामान्य होउ शकतो अशी अनेक उदाहरणे आहेत. विद्यार्थ्यांनी काळाची पावले ओळखून प्राथमिक शाळेत शिक्षणाचा पाया भक्कम करावा असे आवाहन सिंक्रो डिजिटल कंपनीचे श्री. रवी मोटवानी व श्री. कौस्तुभ पवार यांनी केले.
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या श्रीलोचन बालविकास केंद्रात आज स्कुल किट वाटप आयोजित करण्यात आले होते यात आश्रमातील २८ होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कंपनीच्या माध्यमातून मावळ तालुका, मुळशी तालुका आणि पुणे जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये १५५ गरजू विद्यार्थांना शेक्षणिक साहित्य सिंक्रो डिजिटलच्या माध्यमातून वाटप केल्याचे अध्यक्ष श्री. दयानंद कुबल यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला सिंक्रो डिजिटल कंपनीकडून रवी मोटवानी, कौस्तुभ पवार, राहुल डोंगरे, अभिषेक बटवाल,धर्मिन शाह, अभिनंदन यादव, अतितकुमार शाह, हरीश सुब्रमण्य, राहुल अधिकारी आणि साकेत सिन्हा हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रास्ताविक श्री. संदीप कोळी यांनी केले, सुत्रसंचालन प्रकल्प व्यवस्थापक श्रीमती प्रीती पांगे यांनी तर आभार श्रीमती निकिता कंटाळे यांनी मांडले.
