डिंगणे शाळा नं. १ मध्ये पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…

⚡बांदा ता.१४-: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिंगणे नं. १ येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

हे शैक्षणिक साहित्य भारतीय जनता पक्षाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेश धुरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी डिंगणे गावचे सरपंच संजय डिंगणेकर, ग्रामपंचायत सदस्य जयेश सावंत, पालक भास्कर सावंत, प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री. राऊळ, शिक्षक विश्राम ठाकर, रश्मी सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page