१० ऑगस्ट पूर्वी अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागणार…

सर्वोच्च न्यायालयाची नोटीस: सावंतवाडी मतदारसंघ होणार पोरका ?डॉ जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केली भिती

सावंतवाडी ता.१४-: विधानसभेच्या १६ आमदारांच्या अपात्रातेबाबत निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्ष विलंब करीत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे अध्यक्षांना याबाबतचा निर्णय १० ऑगस्ट पूर्वी घ्यावा लागणार आहे. याचाच अर्थ ते 16 आमदार आता अपात्र ठरणार ही निश्चित आहे. त्याच बरोबर विद्यमान शिंदे, फडणवीस आणि पवार सरकार पडणार आहे. विद्यमान राज्य सरकार कोसळणार ही काळया दगडावरची रेग आहे, अशी टीका ठाकरे गटाचे प्रवक्ते डॉ जयेंद्र परूळेकर यांनी केली आहे.

त्यानंतर उर्वरित आमदार अपत्रतेबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान हे सर्व ४० आमदार अपात्र ठरल्यास सावंतवाडी मतदार संघ देखील पोरका होईल अशी भिती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

You cannot copy content of this page