राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन अखेर मागे..

वाहतुक निरीक्षकांकडून लेखी आश्वासन; अन्यथा १५ ऑगस्टला पुन्हा हल्लाबोल

सावंतवाडी ता.१४-: येथील सावंतवाडी बस स्थानक परिसरात आज राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेलं हल्लाबोल आंदोलन अखेर आश्वासनाअंती मागे घेण्यात आले आहे.

येथील बस स्थानक परिसरात असलेल्या समस्या बाबत आज राष्ट्रवादीच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बस स्थानकाला धडक दिली.

यावेळी विविध समस्या बाबत त्यांनी आगार व्यवस्थापकांचा लक्ष वेधले मात्र त्यांना ठोस आश्वासन मिळाले नसल्याने त्याने ते आंदोलन सुरूच ठेवले होते अखेर वाहतूक निरीक्षकांकडून १२ ऑगस्टपर्यंत आपण समस्या सोडू असे लेखी आश्वासन दिल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र 12 ऑगस्टपर्यंत समस्यांना न सुटल्यास आम्ही पुन्हा 15 ऑगस्टला हल्लाबोल आंदोलन करू असा इशारा देखील घारे परब यांनी यावेळी दिला आहे.

यावेळी घारे परब बोलताना म्हणाले की स्थानिक आमदार आणि मंत्री दिपक केसरकर यांना नजरेसमोर असलेल्या या बस स्थानकाची अवस्था पाहून काहीच वाटत नाही का असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला असून याला सर्वस्वी जबाबदार सत्ताधारी राज्यकर्तेच आहेत अशी टिकाही यावेळी सौ.घारे परब यांनी केली.

सावंतवाडी एसटी बस स्थानकांची अवस्था अक्षरशा या दयनीय असेच झाले आहे या ठिकाणी सोयी सुविधा सोडाच साधे बसण्याची ही सोय नसल्याने विद्यार्थी प्रवासी वर्ग तसेच महिला प्रवासी यांचे मोठे हाल होत आहेत एकूणच या परिस्थितीबाबत महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादीच्या सौ घारे परब यांनी एसटी प्रशासनाला अल्टिमेटम देत परिस्थिती सुधारण्याची मागणी केली होती याबाबत तब्बल आठ वेळा त्यांनी पाठ पुरावा केला होता मात्र एसटी प्रशासनाकडून कुठलीही मागणी पूर्ण न केल्याने आज अखेर सौ घारे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट बस स्थानकामध्ये जाऊन हल्लाबोल आंदोलन केले यावेळी त्यांनी बस स्थानकातून सुटणाऱ्या बसेस रोखून धरत प्रशासनाचा व राज्य सरकारचा तीव्र निषेध केला तब्बल दिड तास हे आंदोलन सुरू राहिले यावेळी स्थानकामध्ये बसेस साठी उभ्या असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनीही आंदोलनात सहभाग दर्शवत आपल्याला होणाऱ्या त्रासाबाबत नाराजी व्यक्त केली.

या आंदोलनात महिला जिल्हाध्यक्ष ॲड. रेवती राणे, जिल्हा उपाध्यक्ष असिफ शेख, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष श्री कुबल, चराटा ग्रामपंचायत सदस्य गौरी राऊळ, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी, समीर सातार्डेकर,बावतीस फर्नांडिस, संतोष जोईल, इफ्तेकार राजगुरू , दर्शना बाबर देसाई,आशिष कदम, सावली पाटकर,मारीता फर्नांडिस,ॲड.राबिया शेख आगा, जहूर खान, राकेश नेवगी, नवल साटेलकर,याकूब शेख,जावेद शेख, वैभव परब, शेखर परब, आकाश पांढरे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page