अर्चना घारे परब यांचा नेतृत्व: एसटी बसेस धरल्या रोखून
⚡सावंतवाडी ता.१४-: आम्हाला स्वच्छ बस स्थानक द्या अशी मागणी करत आज राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सावंतवाडी बस स्थानकाला धडक दिली. यावेळी त्यांनी स्थानक प्रमुख संकेत पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यांना ठोस उत्तर मिळाले नसल्याने त्यांनी अखेर एसटी बसेस रोखून धरल्या यावेळी त्यांनी सरकारचा व स्थानिक नेत्यांचा निषेध केला जोपर्यंत लेकी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा देखील घारे परब यांनी यावेळी दिला आहे.
