रोटरी क्लब मालवणच्या अध्यक्षपदी अभय कदम यांची निवड

सचिवपदी संदेश पवार तर खजिनदारपदी बाळू तारी

⚡मालवण ता.१३-: रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ मालवणच्या सन २०२३- २४ या वर्षासाठी अध्यक्ष पदी श्री. अभय कदम यांची निवड करण्यात आली असून सचिव पदी श्री. संदेश पवार व खजिनदार पदी श्रीकृष्ण उर्फ बाळू तारी यांची निवड करण्यात आली आहे. नूतन अध्यक्ष व नव्या संचालक मंडळाचा पदग्रहण व शपथविधी सोहळा दि. १६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता मामा वारेरकर नाट्यगृह मालवण येथे होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

रोटरी क्लब ऑफ मालवणची पत्रकार परिषद मालवण येथील हॉटेल स्वामी येथे पार पडली. त्यावेळी नूतन अध्यक्ष अभय कदम, सचिव संदेश पवार, खजिनदार बाळू तारी, सहसचिव ऋषिकेश पेणकर, उपाध्यक्ष भाऊ साळगावकर, डॉ. लीना लिमये, डॉ. अजित लिमये, उमेश सांगोडकर, महादेव पाटकर, संजय गावडे, रमाकांत वाक्कर, अमरजीत वनकुद्रे आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी अभय कदम म्हणाले, १९९९ साली स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ मालवण संस्था यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. रौप्य महोत्सवी वर्षात अध्यक्ष म्हणून आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जगात आशा निर्माण करणे हे यावर्षी रोटरी क्लबचे ब्रीदवाक्य असून त्या अनुषंगाने मालवण रोटरी क्लब वर्षभर विविध कार्यक्रम राबविणार आहे. यामध्ये शालेय व कॉलेज युवतींसाठी शारीरिक स्वच्छता व आरोग्य मोहीम, दरवर्षीप्रमाणे ‘पोलिओ हटाव मोहीम’, प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जनजागृती व बॉटल क्रशर बसविणे, कापडी पिशव्यांचा वापर, ‘नशापान करून वाहन चालवू नये’ याबद्दल तरुण पिढीमध्ये गांभीर्य निर्माण करणे, वयोवृद्धांसाठी संगणक प्रशिक्षण, शाळांमधून मुलामुलींसाठी ‘Wash in School’ या कार्यक्रमांतर्गत स्वतंत्र स्वच्छतागृहे तसेच हात धुण्याची सोय, समुद्रात बुडलेल्या लोकांना वाचविण्यासाठी मच्छिमारांना प्राथमिक उपचार प्रशिक्षण (Basic Life Support ), कॅन्सरविषयी जनजागृती तसेच कॅन्सर निदान शिबीर. वापरलेले कपडे व खेळणी गरजु मुलांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘क्लॉथ व टॉय बँक’, वृक्षारोपण व रक्तदान शिबीर, रोजगार मेळावा, स्तनपान जागृती, हॅपी स्कुल प्रोजेक्ट, कचऱ्याचे निर्मूलन, पादचारी सुरक्षा जनजागृती आदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच जिल्हास्तरावर रोटरी क्लब मार्फत २०० बायोगॅस युनिट निर्माण करण्यासाठी आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे, असेही अभय कदम म्हणाले. तसेच मालवण मधील गरजू १६ विद्यार्थी व विद्यार्थिनींना सायकल वाटप, २ गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप, कोळंब शाळेला सिलिंग फॅन, व एका महाविद्यालयीन मुलीस आर्थिक मदत करण्यात येणार आहे, असेही अभय कदम यांनी सांगितले.

नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै यांच्या हस्ते आणि माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. राजन देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेश तांडेल, सदानंद टाककर, जेरोन फर्नांडिस, दिपक भोगटे, प्रताप बागवे यांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

रोटरी क्लब मालवणचे नूतन संचालक मंडळ पुढील प्रमाणे – अध्यक्ष -अभय कदम, उपाध्यक्ष -विठ्ठल साळगांवकर, सचिव -संदेश पवार, सहसचिव – ऋषीकेश पेणकर, खजिनदार – श्रीकृष्ण तारी, माजी अध्यक्ष – रतन पांगे, क्लब सर्व्हिस -डॉ. लिना लिमये, कम्युनिटी सर्व्हिस रो. उमेश सांगोडकर, व्होकेशनल सर्व्हिस – महादेव पाटकर, इंटरनॅशनल सर्व्हिस- प्रदिप जोशी, युथ सर्व्हिस – तनिष्का कासवकर, रोटरी फाऊंडेशन -डॉ. अजित लिमये, मेंबरशिप डेव्हलपमेंट – प्रो. अनिल देसाई, क्लब अॅडमिन – प्रो. प्रसन्नकुमार मयेकर, क्लब बुलेटिन – प्रो. सुविधा तिनईकर, सार्जंट ऍट आर्म्स – प्रो. रंजन तांबे, स्पोर्टस चेअरमन – पंकज पेडणेकर, क्लब ट्रेनर – सुहास ओरसकर, लिटरसी प्रमोशन – प्रो. उज्ज्वला सामंत, डायरेक्टर पोलिओ प्लस – डॉ. अच्युत सोमवंशी, क्लब फेलोशिप – अमरजीत वनकुद्रे.

You cannot copy content of this page