अर्चना घारे परब: निवेदन देऊन दखल न घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन…
सावंतवाडी : शहरातील बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत निवेदन देऊनही सुधारणा न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडी व समस्त सावंतवाडीकर नागरिकांच्या वतीने सावंतवाडी बस स्थानकावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांनी दिला आहे.
सावंतवाडी हे तळ कोकणातील महत्त्वाचे शहर आहे. परंतु येथील बस स्थानकाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. गेल्याच महिन्यात आपण पाहणी करत तेथील आगारप्रमुखांना या व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याबाबत निवेदन दिले होते. परंतु जवळपास एक महिना होऊन देखील कुठल्याही प्रकारचा बदल तेथील दुरावस्थेमध्ये झालेल्या नाही, त्यामुळे त्याच वेळी दिलेल्या इशाऱ्यानुसार बस स्थानकावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.
