नेरूर शिरसोस येथे विद्यार्थ्यांना ‘कलेश्वर सिक्युरिटी सर्व्हिस नेरूर’ मार्फत वह्यांचे वाटप…

कुडाळ ता.१३-: जि. प. पू. प्रा. शाळा नेरूर शिरसोस येथे आज सर्व विद्यार्थ्यांना ‘कलेश्वर सिक्युरिटी सर्व्हिस नेरूर’मार्फत मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊही देण्यात आला.


यावेळी कलेश्वर सिक्युरिटी सर्व्हिस नेरूरचे व्यवस्थापक मंगेश परब, क्रीडाप्रेमी अजित मार्गी यावेळी उपस्थित होते. या शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण ठाकूर यांनी सर्वांचे स्वागत केले. दरवर्षी संस्थेकडून शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या व खाऊ वाटप करण्यात येते त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षिका प्रीती कुबल, अरूणा घाटकर तसेच पूजा कोठावळे उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page