पाडलोस केणीवाडा शाळेस सिलिंग पंखा प्रदान

⚡बांदा ता.१३-: सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना अनेक समस्या आहेत. याची दखल घेत केणीवाडा शाळेतील विद्यार्थ्यांना सिलिंग पंखा नसल्यामुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजन पटेकर व अमोल नाईक यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडलोस नंबर 2 ला स्वखर्चातून सिलिंग पंखा भेट दिला. तसेच मुंबई येथील वकील प्रेमानंद साळगावकर यांच्या मार्फत आजी-माजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.


यावेळी मुख्याध्यापक अस्मिता आरोसकर, शालेय समिती अध्यक्ष हर्षद परब, सदस्य अमिषा पटेकर, मीना कुबल, अंगणवाडी सेविका अश्विनी साळगावकर, ग्रामस्थ प्रतीक्षा नाईक, संगीता केणी, लता नाईक, प्रतिभा केणी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक अस्मिता आरोसकर यांनी केले तर आभार अध्यक्ष हर्षद परब यांनी मानले.

You cannot copy content of this page