⚡बांदा ता.१३-: कळणे येथील श्री देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ आणि गोव्यातील ख्यातनाम भजनी गायक विठ्ठल शिरोडकर यांच्या शिष्य परिवारातर्फे कळणे येथे एक दिवशीय भजन कार्यशाळा आयोजित केली आहे. कळणे माऊली मंदिर सभागृहात रविवार १६ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही कार्यशाळा चालणार आहे.
या कार्यशाळेला गोव्यातील भजनी कलाकार विठ्ठल शिरोडकर हे शास्त्रीय रागावर आधारीत अभंग, गवळण, गजर यांचे सादरीकरण दाखविणार आहेत. या एकदिवशीय कार्यशाळेचा भजन प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे सचिन देसाई, कृष्णा देसाई, शरद देसाई व गिरीश नार्वेकर यांनी केले आहे.
