⚡सावंतवाडी ता.१३-:
सावंतवाडी शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अल्पसंख्या अध्यक्षपदी जहूर खान यांना विधी मंडळाचे विरोधी पक्ष नेते जितेंद्र आव्हाड यांनी नियुक्तीपत्र दिले.
सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असलेल्या जहूर खान यांनी सावंतवाडी शहरात राष्ट्रवादी ऊर्जितावस्था आणली.
जहूर खान यांच्या संघटनात्मक कामाची दखल घेत, पक्ष श्रेष्ठीनी जहूर खान यांची सावंतवाडी शहर अल्पसंख्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे.
