कृषी विज्ञान केंद्राच्या “स्मृती प्रोजेक्टचा” लाभ घ्या…

सुशांत नाईक:कणकवली शहरातील 90 बचतगटांना कृषी विज्ञान केंद्र किर्लोसने केले मार्गदर्शन

⚡कणकवली ता.१२-: कृषी विज्ञान केंद्राच्या “स्मृती प्रोजेक्टचा” जास्तीत जास्त लाभ कणकवली शहरातील महिला बचतगटांना कसा होईल व आर्थिक उन्नती कशी होईल या दृष्टीने शहरातील महिला बचतगटांनी घ्यावा असे आवाहन किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे संचालक सुशांत नाईक यांनी केले

कणकवली शहरातील 90 बचतगतांना कृषी विज्ञान केंद्र किर्लोस यांच्यावतीने कृषी विषयक मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी छोटे-मोठे व्यवसाय करून आपली आर्थिक उन्नती व विकास कसा करावा या विषयी शहरातील 90 बचतगटाच्या अध्यक्षा व महिला प्रतिनिधिंना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना काजरेकर , आनंद सावंत व बांबूलकर यांनी कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ कणकवली शहरातील बचतगतांना होईल असा विश्वास व्यक्त केला.
कृषी विज्ञान केंद्राचे संचालक सुशांत नाईक यांच्यावतीने या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नीलम सावंत यांनी ही महिलांनी कस सक्षम व्हावे या बद्दल मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घेण्यात आला.
यावेळी संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त 14 जुलै रोजी या सर्व बचतगटातील महिलांना म्हणजे जवळपास 800 महिलांना भेटवस्तू देण्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी गौरव हर्णे, साक्षी आमडोस्कर, दिव्या साळगावकर व शहरातील बचतगटांच्या अध्यक्षा व महिला प्रतिनिधी उपस्थित होते.

You cannot copy content of this page