आमदार वैभव नाईक यांनी दिली माहिती
⚡कणकवली ता.१२-: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीसा पाठवल्याचे म्हटले आहे. मात्र ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी आमदार असताना अद्यापही मला नोटीस आलेली नाही. अशी माहिती आम. वैभव नाईक यांनी दिली.
कणकवली येथे पत्रकारांशी बोलताना आम.वैभव नाईक म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाना नोटीस पाठवणार असल्याचे म्हटले होते मात्र मला अद्याप पर्यंत नोटीस आलेले नाही त्यामुळे आमची बाजू सत्याची असल्याचे स्पष्ट होत असून आमचे पक्ष प्रतोद हेच अधिकृत आहेत हे कोर्टाने सिद्ध केलेले आहे. त्यामुळे पुढील काळात शिवसेना पक्षातून बाहेर पडलेले आमदार अपात्र ठरतील, असा विश्वास शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे.
