आम.वैभव नाईक:प्रशासनाने एसटीचे बिल द्यावे..
⚡कणकवली ता.१२-: शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने एसटी महामंडळाच्या गाड्या वापरण्यात आल्या कार्यक्रम उलटून महिना उलटला तरी एसटी महामंडळाचे दीड कोटी रुपये अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाहीत. नाहीत. सद्या डिझेल, टायर,गळती,दरवाजा व अन्य कारणांमुळे एस्टी फेऱ्या बंद होतात.कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाहीत,त्यामुळे तातडीने प्रशासनाने एसटीचे बिल द्यावे अशी मागणी आ.वैभव नाईक यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रम कुडाळ येथे पार पडला.शासन आपल्या दारीसाठी एस.टी. बस जिल्ह्यातील आणि बाहेरून मागविण्यात आल्या होत्या.त्यामुळे जनतेला एसटी बस सेवा मिळाली नव्हती. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने शासकीय यंत्रणेचा वापर करण्यात आला.लोकांना जबरदस्ती नेण्यात आले.मात्र, एसटी महामंडळचे दीड कोटी जमा केलेले नाहीत. सद्या एस टी महामंडळाचे अवस्था बिकट असताना हा भुर्दंड कशासाठी असा सवाल करताना शासनाने एसटी महामंडळाचे पैसे द्यावेत अशी मागणी आ.वैभव नाईक यांनी केली आहे.
