मालवण उद्धव ठाकरे पक्षाच्या युवती सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर…

शहर अधिकारीपदी सुर्वी लोणे तर उपशहर अधिकारी पदी माधुरी प्रभू

⚡मालवण ता.१२-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवती सेनेच्या वतीने मालवणमध्ये पदाधिकारी नियुक्त्या करण्यात आल्या असून मालवण शहर अधिकारीपदी सुर्वी सूरज लोणे तर उपशहर अधिकारी पदी माधुरी अन्वय प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना ( उद्धव ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने आणि युवती सेना समन्वयक रुची राऊत यांच्या सहयोगाने मालवणमध्ये युवती सेनेच्या वतीने पदाधिकारी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सुर्वी सूरज लोणे आणि माधुरी अन्वय प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मालवण शिवसेना (उद्धव ठाकरे) शाखेमध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कुडाळ मालवणच्या युवती सेना समन्वयक सौ. शिल्पा खोत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ही नियुक्तीपत्र त्यांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार ओरसकर, दीपक देसाई, सन्मेष परब, उमेश मांजरेकर, प्रसाद चव्हाण, सिद्देश मांजरेकर, उमेश चव्हाण, अक्षय भोसले, करण खडपे, युवती सेना तालुका अधिकारी निनाक्षी शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी मालवण शहरात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपल्याला मिळालेल्या पदाचा उपयोग करणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली .

You cannot copy content of this page