दोघे जखमी
*💫कणकवली दि.२८-:* महामार्गावर जानवली येथे रविवारी सकाळी रिट्झ कार आणि मोटरसायकलमध्ये अपघात घडून दोघे जखमी झाले आहेत. सतीश मयेकर ( रा.जळकेवाडी ,कणकवली ) हे आपल्या ताब्यातील रिट्झ कार ने जानवली येथून साकेडी फाट्यावर वळत असताना मागून येणाऱ्या मोटरसायकलची धडक कारला बसली. यात मोटरसायकचालक रावजी ओटवकर व त्यांची मुलगी जखमी झाली. दोन्ही जखमींना सतीश मयेकर यांनी आपल्या कारमधून कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले.अपघाताची नोंद कणकवली पोलिस ठाण्यात झाली आहे.
