*जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
कणकवली : महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या वतीने नॅशनल हायवे क्र 66 वर ओसरगाव येथील महामार्ग मृत्युंजय दूत गट चे उदघाटन जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते 1 मार्च रोजी सकाळी 10 वाजता ओसरगाव टोलनाका येथे होणार आहे. यावेळी ओसरगाव सरपंच प्रमोद कावले, खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, रोटरी क्लब कणकवली चे प्रेसिडेंट लवू पिळणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कोरोनासंदर्भातील सर्व नियम पाळून उदघाटन समारंभ होणार आहे अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र चे प्रभारी अधिकारी एपीआय अरुण जाधव यांनी दिली आहे.
