*अचानक लागलेल्या आगीत ३५ एकर क्षेत्रातील कलम बाग जळून खाक*

*💫देवगड दि.२८-:* देवगड तालुक्यातील मणचे तिठा परिसरातील सुमारे ३५ एकर क्षेत्रातील कलमबागा अचानक लागलेल्या आगीत भक्ष्यस्थानी पडल्या आहेत.मिळालेल्या माहितीनूसार ही आग रविवारी दुपारी १ वा.सुमारास लागली. राजन गुरव, दिनकर गुरव, मन्सूर सोलकर, शमसू सोलकर, आप्पा काळे, बबन काळे, तुकाराम काळे, उगारे, अस्लम मुल्ला, विनायक मणचेकर, भास्कर मणचेकर, हनि\ मुल्ला, सचिन तारी, पोकळे या बागातदारांच्या बागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत.यामध्ये बागायतदारांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी धावाधाव करून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.आगीचे कारण निश्चित समजू शकले नाही.

You cannot copy content of this page