आम. नितेश राणे यांनी मुंबईतून आणले १२ कर्मचारी

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग सेवेत रुजू

⚡कणकवली ता.११-: कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा दर्जेदार मिळावी यासाठी निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कमी असलेला कर्मचारी वर्ग आम. नितेश राणे यांनी उपलब्ध करून दिला आहे. आरोग्य विषयक ज्ञान असलेले प्रशिक्षित तब्बल १२ कर्मचारी मुंबई येथील संस्थेच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयात सेवा देण्यासाठी रुजू केले आहेत.

या कर्मचाऱ्यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सेवा देण्यास सुरुवात केली त्यांचे स्वागत रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. धर्माधिकारी यांनी केले.
कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने तालुक्यासह वैभववाडी, देवगड ,मालवण, कसाल, आब्राड, सोनवडे अशा भागातील अनेक रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येतात. सकाळची रुग्ण तपासणी नऊ वाजल्यापासून सुरू होते.दर दिवशी ५०० पेक्षा जास्त रुग्ण उपचारासाठी येत असल्याने सहाजिकच कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे एकूणच सेवेवर परिणाम होऊ लागला.आरोग्य तपासणी करण्याच्या पूर्वी केस पेपर काढण्यासाठी रांगा लागू लागल्या. औषधे घेण्यासाठी रांगा लागू लागल्या. रुग्णालयात ॲडमिट असलेल्या रुग्णाला सेवा देण्यासाठी कर्मचारी कमी पडू लागले. त्यामुळे गैरसोय म्हणजेच उपजिल्हा रुग्णालय अशी समज रुग्णांची होऊ लागली. कमी स्टाफमुळे आहेत या कर्मचाऱ्यांवर अधिकचे काम करण्याची वेळ आली. या सर्व बाबी लक्षात घेता कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे रुग्णांना सेवेसाठी तिष्ठत राहावे लागते हे आमदार नितेश राणे यांच्या लक्षात आले. आम. नितेश राणे यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे प्रश्न जाणून घेताना कोणत्या अपेक्षा आहेत यावर चर्चा ते कशा पद्धतीने सोडवता येतील यावर आम. नितेश राणे यांनी रुग्णालयाचे अधिक्षक व प्रमुख डॉक्टरांशी चर्चा केली. त्यानंतर मुंबई स्थित आरोग्य विषयक सेवा सुविधा देणाऱ्या एनजीओच्या माध्यमातून 12 कर्मचारी ज्यांना आरोग्य विषयक ज्ञान आहे, रुग्णालयातील कामाचा अनुभव आहे.असे कर्मचारी आमदार नितेश राणे यांनी देण्याचा शब्द दिला होता आणि ते कर्मचारी ११ जुलैपासून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सेवेसाठी हजर झाले आहेत.

फोटो
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा दर्जेदार मिळावी यासाठी आम.नितेश राणे यांनी १२ कर्मचारी मुंबई येथील संस्थेच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयात सेवा देण्यासाठी रुजू केले आहेत त्यांचे स्वागत करताना रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. धर्माधिकारी.

You cannot copy content of this page