मंत्री दीपक केसरकर;; वन खात्याचा प्रश्न सुटल्यावर पूर्ण प्रश्न सुटला असे म्हणता येईल
⚡आंबोली, ता.१०:-: कबुलयातदार गावकर हा प्रश्न अजून सुटलेला नाही,अर्धाच प्रश्न सुटला आहे. ज्यावेळी वनखात्याच्या प्रश्न सुटेल त्याचवेळी प्रश्न सुटला असे म्हणता येईल,सत्तेच्या माध्यमातून हा प्रश्न देखील सोडवला जाईल असे प्रतिपादन आंबोली माऊली मंदिर येथे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
आंबोली माऊली मंदिर येथे कबुलयातदार प्रश्न सोडवल्याप्रकरणी आमदार मंत्री दिपक केसरकर यांचा सत्कार आंबोली माऊली मंदिरात ठेवण्यात आला होता. यावेळी श्री.मंत्री केसरकर बोलत होते.
यावेळी शशिकांत गावडे,श्रीकांत गावडे यांच्याहस्ते ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी शशिकांत गावडे व श्रीकांत गावडे यांच्याहस्ते ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफक पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शशिकांत गावडे,श्रीकांत गावडे,बाळा गावडे(चौकुळ),जिल्हा परिषद प्रशासक प्रजित नायर,प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर,तहसीलदार श्रीधर पाटील,शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी,नारायण राणे, सरपंच सावित्री पालेकर,राघोजी सावंत जिल्हा परिषद प्रशासक प्रजित नायर,प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर,तहसीलदार श्रीधर पाटील,दिनेश गावडे( चौकुळ)अनंत गावडे,संघर्ष समिती,ग्रामपंचायत सदस्य.आंबोली,चौकुळ, गेळे येथील ग्रामस्थ ,सर्कल गुरव तसेच ग्रामस्थ,महिला उपस्थित होते.
यावेळी शशिकांत गावडे म्हणाले कोणीही विरोध न करता एकमताने निर्णय घेऊया.आतापर्यंत जसे सहकार्य केले तसेच यापुढे करावे.वनखात्याकडची जमिनीचा प्रश्न सोडवावा.आंबोलीत बाहेरच्या लोकांनी घरे बांधली आहेत जागा घेतल्या आहेत.त्यामुळे इथे जमीन वाटताना वादंग होणार आहेत.तरी सर्वाना सामावून घेऊन हा प्रश्न सोडवावा.हा प्रश्नसोडवण्याचे श्रेय हे युती असल्याने पालकमंत्री रवींद्र चव्हाण,राजन तेली,दीपक केसरकर या तिघाचेही आहे.कोणाच्याही कोंब्याने उजाडुदेत.पण उजेड पडुदेत.यावेळी मंत्री ना.दीपक केसरकर म्हणाले,महाराष्ट्रत 45 हजार हेक्टर फॉरेस्ट आहे मात्र त्यातील सिंधुदुर्गात 42 हजार हेक्टर वर वन लागले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयानुसार वनसदृश्य जमीन ही खाजगी जमिनिप्रमाणे विकता येते सर्व व्यवहार करता येतात.सत्तेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न आहेत.जिल्हा कमिटी मध्ये आपण तसेच प्रांत तहसीलदार,मुख्यकार्यकारी अधिकारी असे सगळे मिळून एक नियोजन तिन्ही गावासाठी करण्यात येणार आहे. चौकुळ ग्रामस्थांची मीटिंग पुढच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे.गेळ्यातील लोकांचे वाटप त्यांच्या म्हणण्यानुसार ठरणार आहे.
चौकुळ च्या लोकांनी आपल्याला कसा प्रश्न सोडवायचा आहे ते सांगावे त्याप्रमाणे सोडवू. 75 कुटुंब बाहेरून येऊन इथे स्थायिक झाल्याने त्याना फक्त घरापूर्ती जागा मिळेल. वनखात्याचा प्रश्न अजून सुटायचा आहे त्यामुळे हा अर्धा प्रश्न सुटला. अडीज वर्षांपूर्वी आपण स्टे उठवण्याची मागणी पक्षप्रमुखांकडे केली पण उठवला नाही. स्कूल बसमधून गेळे येथे सगळी मुले विनामूल्य त्या ठिकाणी ५०० मुलांची शाळा बांधण्यात येणार आहे.९ हेक्टर जागा आरक्षित करून लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे.मी शिक्षण मंत्री असल्यामुळे पहिली शाळा या ठिकामी मतदारसंघात इतर जिल्ह्याप्रमाणे आणली आहे.
शिक्षक देखील तेथेच राहणार असून मुलांना बस ने ये जा करण्यात येणार आहे.दर्जेदार शिक्षण देण्याचा मानस आहे.वेंगुर्ला आणि दोडामार्ग या ठिकाणी 100 मुलांसाठी वस्तीच्या शाळा बांधण्यात येणार आहे.महाराष्ट्रात सध्या सर्वात मोठी 30 हजार शिक्षक भरती झाली आहे हायकोर्टाने स्थगिती दिल्याने नेमणूक मिळालेली नाही.20 हजार देऊन तात्पुरती नेमणूक दिली जाणार आहे.
यावेळी दीपक केसरकर म्हणाले, आंबोली हे सर्वाधिक पावसाचे ठिकान आहे हिल्स स्टेशन आहे मात्र आंबोलीची उंची ८६० मीटर आहे. एक हजार फूट उंची असली तर नगरपंचायत मिळते. यानंतर येथील जकातवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. मुलांशी संवाद साधला. एमबीबीएस चा अभ्यासक्रम देखील मराठीतून करण्यात येत आहे.
इंग्रजी भाषा देखील शिकणे आवश्यक आहे.अनेक देश यांची स्वतः ची भाषा आहे.त्यांची प्रगती आहे त्यामुळे मराठी भाषेला आपण तेवढंच महत्व दिले पाहिजे.परदेशात शिकण्यासाठी देखील शासनाच्या विविध सवलती आहेत.यावेळी हायस्कुल शाळेसाठी मुलांसाठी शॉचालय नसल्याबाबत लक्ष वेधल्यानंतर या ठिकाणी आपण शॉचालय मजूर करत असल्याचे सांगितले.यावेळीं मुख्याध्यापक अनिल चाळूचे, हौसा गवस, तसेच हायस्कूलचे शिक्षक डी पी सावंत, श्री.मोरे,बाळा गावडे सरपंच सावित्री पालेकर,प्रांत प्रशांत पाणवेकर उपस्थित होते.
आंबोली माऊली मंदिर कडे सभागृह हॉल मंजूर करण्यात आला असून त्याचे भूमिपूजन नामदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीकांत गावडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.विविध कार्ये आणि लग्नसमारंभ करण्यासाठी हे काम करण्यात येणार आहे.
माऊली मंदिर येथे अडीज वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन शिवसेनेचे लोकनियुक्त पदाधिकारी यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले होते.तेव्हा हे काम मंजूर होते मात्र काम झाले नहोते. आता शिंदे सरकारमध्ये गेल्यानंतर पुन्हा स्वतः दीपक केसरकर यांनी भूमिपूजन केले.एकाच कामाचे 2 वेळ भूमिपूजन झाले आहे.
