⚡वैभववाडी ता.१०संजय शेळके-: ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या कुडाळ तालुका अध्यक्षपदी सौ.संजना सावंत यांची निवड करण्यात आली.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची जिल्हा कार्यकारिणी व सर्व तालुका कार्यकारिणीची संयुक्त सभा नुकतीच कणकवली येथे संपन्न झाली.या सभेमध्ये कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक व जिल्हाध्यक्ष मंदार काणे यांनी सौ.संजना सावंत यांची कुडाळ तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचे यावेळी जाहीर केले.
कुडाळ तालुका अध्यक्षपदी सौ.संजना सावंत यांची तर उपाध्यक्षपदी गणेश मेस्त्री आणि यशवंत गावडे यांची एकमताने निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
