माजी आम. प्रमोद जठार यांनी वेधले नाम.भागवत कराड यांचे लक्ष
⚡कणकवली ता.०९-: रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू प्रक्रिया कारखानदारांची कर्जे १० वर्षांकरिता पूनर्गठीत करून मिळाल्यास सर्वांना हप्ते भरणे सोयीचे होईल व कर्जाची परतफेडही होईल असे निवेदन माजी आमदार प्रमोद जठार यांनी केंद्रीय अर्थ राज्य मंत्री नाम. भागवत कराड यांना सादर केले आहे
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू प्रक्रिया धारकांनी २०१८ मध्ये काजू दर १८० रू. दराने खरेदी केला. परंतु परदेशातून आयात केलेल्या काजुचा दर ११० रू. होता. यामुळे कारखानदारांचे फार मोठे नुकसान झाले. परिणामी घेतलेले कर्ज परतावा करता येत नसल्याने काही प्रकरणे एनपीए झाली आहेत. त्यामुळे या सर्व कारखानदारांची कर्जे १० वर्षांकरिता पूनर्गठीत करून मिळाल्यास सर्वांना हप्ते भरणे सोयीचे होईल व कर्जाची परतफेड ही होईल. अशा मागणीचे पत्र माजी आमदार प्रमोद जठार व काजू प्रक्रिया धारक संघ यांनी केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड याना दापोली येथे मंत्र्यांचा दौरा असताना भेट घेऊन दिले.
