तीन किमी परिसरात वाहनांची गर्दी
यात्रेचे स्वरूप:तिकीट नसल्याने पर्यटकांतून समाधान
आंबोली,ता.९: अनिल चव्हाण-:येथे वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या आंबोलीतील पर्यटकांसाठी आणि राज्यमार्गावरील वाहतूक कोंडी साठी पोलिसांनी चोख व्यवस्था केली.तरी पर्यटकांच्या गाड्या खूपच असल्याने दुपारनंतर वाहतूक कोंडी झाली.दीड किलोमीटर रांगा लागल्या होत्या.
चौकुळ रस्त्याला गाड्यापार्किंग करून धबधब्याकडे पर्यटकांना चालत सोडण्यात येत होते. तसेच थेट सावंतवाडी गोवा जाणाऱ्यांना मध्ये कुठे थांबायचं नाही असे सांगून सोडण्यात येत होते.त्यामुळे आंबोली घाटात पर्यटकांनी यात्रेचे स्वरूप आले होते.३ किलोमीटर चालत जावे लागत होते.आज पाऊस कमी होता.धबधब्याकडे पर्यटकांना कोणतेही तिकीट नसल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केले.कोणत्याही सुविधा नसताना तिकीट घेणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. कावलळेसाद येथे ही पोलिसांनी पार्किंग ची व्यवस्था चांगली केली होती. मात्र रस्ता अरुंद असल्याने थोडी वाहतूक कोंडी होत होती. ५५ पोलीस आणि ६ अधिकारी असा पोलीस बंदोबस्त होता .
पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी हे हजर होते. ऑटोमॅटिक मशीन द्वारे आंबोलीत नियम भंग करणाऱ्या दुचाकी स्वरांकडून पर्यटकांकडून दंड वसूल केला जात होता. आंबोलीत हजारो गाड्यासह हजारो पर्यटकांनी हजेरी लावली होती. तरुणाई जास्त असते.
गोवा,कोल्हापूर,बेळगाव,सिंधुदुर्ग,सांगली,सातारा,पुणे,मुबई,ठाणे, सह अनेक जिल्ह्यातील,राज्यातील पर्यटक आंबोलीत एन्जॉय साठी येतात.पावसाळ्यात आंबोली एक पर्यटकांसाठी एन्जॉयमेंट चे ठिकाण आहे. येथील हिरण्यकेशी,महादेवगड,कावळेसाद पॉईंट येथे पर्यटकांची गर्दी होती.काही पर्यटकांनी जेवण आणले होते मिळेल त्या ठिकाणी तसेच गाड्या लावून जेवण करत होते. आंबोलीत अनेक स्टॉल धारकांना कणीस व्यवसायिकांना व्यवसाय मिळाला. दुपारी वाहतूक कोंडी झाली त्यामुळे अनेक जण वैतागले होते.गाड्या एवढ्या होत्या आंबोलीत गाड्या लावायला जागा नहोती त्यामुळे दुपारनंतर ट्राफिक जॅम झाले.
पोलिसांची संख्या दुपारनंतर कमी पडत होती. आंबोली पोलिसांनी इतर दिवशी देखील नियोजन ठेवले आहे.दिवसा पोलीस पेट्रोलिंग करतात. शिस्तबद्ध पर्यटनासाठी आणखी नियोजनाची आवश्यकता आहे.
