बांदा येथे कृषी विभागाने केली श्री पद्धतीने लागवड

सिंधूरत्न समृध्दी योजने अंतर्गत राबविला उपक्रम

बांदा/प्रतिनिधी
खरीपाच्या हंगामास जोरदार सुरूवात झाली असून शेतक-यांबरोबरच शेतक-यांना मार्गदर्शन करणारा व विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविणारा कृषि विभागही जोरदार कामाला लागला आहे. कृषि विभागाने २५ मे पासूनच कामाला सुरूवात केली असून सुरूवातीपासून खरीप विशेष मोहिमेतंर्गत बियाणे बिजप्रक्रिया, नंतर सिंधुरत्न समृद्धी योजनेतंर्गत भात बियाणे व नागली बियाणे वाटप, शेतकरी निवड ,पी.एम.किसान ई- केवायसी कॅम्प,खरीप भात शेतीशाळा,२५ जून ते १ जुलै कृषि संजीवनी सप्ताह व १ जुलै पासून १ रूपयात भात पिक, नागली विमा प्रचार प्रसिद्धी बरोबर आज बांदा येथे प्रमोद यशवंत देसाई यांच्या शेतात सिंधुरत्न समृद्धी योजना अंतर्गत चक्क शेतात जावून मशागतीबरोबरच श्री पद्धतीने भात लागवडीच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.


त्यावेळी तालुका कृषि अधिकारी जी. एस. गोरे यांनी स्वतः बैलजोडी चालवित मशागत करून बांदा मंडळातील आपल्या सहका-यांसमवेत अधिक उत्पादन देणा-या भात पिक ‘श्री’ पद्धतीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्या बरोबरच डेगवे येथील दादा भालचंद्र देसाई यांचे क्षेत्रात काजू फळबाग लागवडीचा शुभारंभ केला. आणि नारळ व सुपारी बागेला भेट देऊन मार्गदर्शन केले. त्यावेळी त्याचेसमवेत बांदा मंडळ कृषि अधिकारी यु. जी. भुईंबर, बांदा कृषी पर्यवेक्षक प्रकाश घाडगे, श्री. सरगुरू, डेगवे कृषी सहाय्यक अतुल माळी, तांबुळी श्री निकम, शेर्ला श्रीमती बेळगुंदकर, नेतर्डे श्रीमती सावंत, तसेच शेतकरी प्रमोद देसाई, दादा देसाई, आबा देसाई आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे नियोजन कृप प्रकाश घाडगे आणि कृषी सहायक अतुल माळी यांनी केले होते.
फोटो :-
बांदा येथे शेतात जोत चालवताना तालुका कृषी अधिकारी जी.एस.गोरे. (छायाचित्र – निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page