सामाजिक संस्थांच्या पुढाकार
मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहरातील दांडी येथील जि.प.पूर्ण प्राथमिक दांडी शाळेमध्ये युवा संदेश प्रतिष्ठान आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमंत चिंदरकर, उपाध्यक्ष पंकज धुरी, शिक्षणतज्ज्ञ दिनकर शेलटकर, दयानंद मालंडकर, पांडुरंग सारंग, लिलाधर धुरी, सौ.राधिका मोरजकर, सौ.जेनी, सौ.मनिषा ठाकुर, सौ.अमृता राणे, मुख्याध्यापिका सौ.विशाखा चव्हाण, राज्यपुरस्कार प्राप्त पदविधर शिक्षक शिवराज सावंत सर, विश्वास मोंडकर आदी मान्यवर तसेच पालक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज सावंत यांनी केले तर आभार सौ.मनिषा ठाकुर यांनी मानले.
