भाऊ गुराम यांच्या स्मरणार्थ मुलाने केले छत्री वाटप

गुरामवाड ग्रामपंचायत येथे राबविला उपक्रम

मालवण (प्रतिनिधी)

कै. भाऊ गुराम यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र दिलीप रामचंद्र गुराम यांनी ग्रामपंचायत वरची गुरामवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य, साहाय्य सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, सर्व ग्रा. प. कर्मचारी, व सर्व आशा स्वयंसेवीका यांना गुलाब पुष्प देऊन छत्री, पेढे, लक्ष्मीची प्रतिमा भेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.

तसेच यावेळी गावातील लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रथमोपचारासाठी लागणारे साहित्य व औषधे तीनही आशांना दिली. तसेच राजश्री राजेश गुराम यांना दिलीप गुराम यांनी आर्थिक मदतही केली. यावेळी ग्रा. प. सदस्य बाबू टेंबुलकर, वंदेश ढोलम, मयूरी कुबल, श्रद्धा संजय गुराम, सुप्रिया संदिप गुराम, संपदा अमोल वालावलकर, विद्या गिरकर, ग्रामसेवक प्रकाश सरमळकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल गुराम, ग्रा. प. कर्मचारी श्रीकांत भोजणे, सोनाली भोजणे, संकेत परुळेकर, महादेव गोठणकर, आशा मृण्मयी ढोलम, अनुष्का गुराम, पाडावे, बाळू हंजणकर, दादा रावले आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page