अध्यक्षपदी विश्वास गावकर यांची निवड
⚡मालवण ता.०६-: लायन्स क्लब ऑफ मालवणच्या अध्यक्ष पदी पुन्हा एकदा विश्वास गावकर यांची निवड करण्यात आली असून नूतन अध्यक्ष व त्यांच्या कार्यकारी मंडळाचा शपथविधी व पदग्रहण सोहळा दि. ९ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता येथील दैवज्ञ भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. एमजेएफ राजेंद्र शहा कांसवा (रिजनल चेअरमन) यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
लायन्स क्लब मालवणचे नूतन संचालक मंडळ पुढीलप्रमाणे :- अध्यक्ष- विश्वास गावकर, माजी अध्यक्षा वैशाली शंकरदास, सचिव-उमेश शिरोडकर, खजिनदार – सचिन शारबिद्रे, प्रथम उपाध्यक्ष- अनुष्का चव्हाण, द्वितीय उपाध्यक्षा-अंजली आचरेकर, तृतीय उपाध्यक्ष-सहदेव बापर्डेकर, सहसचिव- स्नेहा जामसंडेकर, सहखजिनदार – मीना घुर्ये, टेल ट्रिस्टर- पल्लवी खानोलकर, टेमर- स्वप्नाली नेरुरकर, स्वच्छ भारत-श्वेता यादव, लायन क्रेस्ट-जयश्री हडकर, मेंबरशिप चेअरमन- राधिका मोंडकर, पीआरओ-दिक्षा गावकर, जीएसटी चेअरमन-राजा शंकरदास.
तरी या पदग्रहण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन माजी अध्यक्षा वैशाली शंकरदास, खजिनदार अंजली आचरेकर, सचिव अनुष्का चव्हाण यांनी केले आहे.
