⚡मालवण ता.०६-: मालवण तालुक्यातील रेवंडी येथील श्री देवी भद्रकाली देवस्थान ट्रस्ट तर्फे रेवंडी,सर्जेकोट, मिर्याबांद येथील दहावी बारावी, पदवी परीक्षेत साठ टक्केच्यावर गुण मिळविणारया विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तर या भागातील अंगणवाडी ते पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम देवस्थान समिती अध्यक्ष युवराज कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमास सचिव विजय कांबळी, खजिनदार जयराम कांबळी, अशोक कांबळी, सदानंद कांबळी, रेवंडी सरपंच वस्त,माजी सभापती सोनाली कोदे,लिपिक नंदू कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते.
भद्रकाली देवस्थान तर्फे गेली चोवीस वर्ष हा उपक्रम राबवित आहे.तसेच गरजूंना वैद्यकीय मदत देणे,यावर्षी पाणी टंचाईत वरील गावातील लोकांना देवस्थान तर्फे पाणी वाटप करण्यात आले. आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, विधी सेवा समिती कार्यक्रम, बचतगट, पशुपालक आदींसाठीही विविध उपक्रम देवस्थान तर्फे राबविण्यात येत आहेत.
