राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत नील बांदेकर प्रथम.

बांदा ता.०६-: अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित, आषाढी एकादशी निमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत केंद्र शाळा बांदा नंबर एक मध्ये पाचवीत शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर याने संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला.

चित्रकलेचा विषय चंद्रभागेच्या तिरी उभा पांडुरंग असा होता .
यामध्ये राज्यभरातून अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता .या सर्व विद्यार्थ्यांमधून नीलने प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्याचे नाव रोशन केले
.त्यासाठी त्याला त्याचे मामा बालरोग तज्ञ डॉ. उमेश सावंत यांचे योग्य असे मार्गदर्शन लाभले. नीलने आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन अनेक बक्षिसे पटकावली आहेत. यासाठी त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

You cannot copy content of this page