Headlines

हवामान खात्याचा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

सर्व विभागांनी समन्वयाने कामकाज करावे-: मच्छिंद्र सुकटे

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०५-: अतिवृष्टी लक्षात घेता सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे व कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाच्या (02362) 228847 या संपर्क क्रमांकावर तात्काळ माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले.

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात दि 5 जुलै 2023 रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे आणि हवामान विभागामार्फत जिल्ह्यासाठी रेड अलर्ट (204 मिमी पेक्षा जास्त पाऊस) जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच 6 जुलै 2023 रोजी जिल्ह्यात मुसळधार ते अति अतिवृष्टी (ऑरेंज अलर्ट) आणि 7, 8 आणि 09 जुलै 2023 रोजी अतिवृष्टीची (यलो अलर्ट) शक्यता आहे. वरील माहितीनुसार जिल्ह्यातील सर्व विभागांना पुढील सूचना देण्यात येत आहेत
(1) सर्व विभागांनी त्यांच्या अखत्यारीतील यंत्रणांना अतिवृष्टीची पूर्वसूचना द्यावी आणि त्यानुसार आवश्यक नियोजन करावे.
(२) विभागांनी त्यांची शोध आणि बचाव उपकरणे चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करावी.
(३) प्रत्येक विभाग नागरिकांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक प्रकाशित करेल. हे नोंद घ्यावे की दिलेले संपर्क क्रमांक मुसळधार पावसात कार्यरत राहतील, याची दक्षता घ्यावी.
(४) सर्व विभाग/कार्यालय प्रमुखांनी आपापल्या मुख्यालयात उपस्थित रहावे, कोणीही मुख्यालय सोडणार नाही. आपल्या अधीनस्थ यंत्रणेलाही तसे आदेश देण्यात यावेत.
(६) बांधकाम विभागाने रस्त्यांवर पडलेली झाडे तात्काळ हटवावीत जेणेकरून वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
(७) बंदर विभागाने अतिवृष्टीच्या कालावधीत भरती-ओहोटीच्या तारखा जिल्हा आणि तालुका प्रशासनाला उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच त्यांना वृत्तपत्रातून प्रसिद्धी द्यावी.
(8) महसूल आणि पोलीस विभागाने त्यांच्या ताब्यातील बोटी चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करावी.

You cannot copy content of this page