कबुलायतदार प्रश्न मिटल्याने स्थानिकांना होणार फायदा

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले मत

सावंतवाडी : अनेक वर्षे प्रलंबित आंबोली-गेळे-चौकुळ कबुलायतदार प्रश्न अखेर सुटला आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रश्नास मान्यता मिळाली. आता याचा आंबोली- गेळेतील लोकांना फायदा होणार आहे. या साठी सातत्याने पाठ पुरवठा करणारे करणारे स्थानिक आमदार तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपलं मत व्यक्त केले आहे.

ते म्हणाले, तीन वर्षांपूर्वी हा प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सोडवून घेतला होता. चंद्रकांत पाटील यावेळी महसूल मंत्री होते. जेव्हा सरकार बदलले तेव्हा यास स्थगिती दिली.‌ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती स्थगिती उठवली आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वारंवार भेटून लक्ष न दिल्याने हा प्रश्न मार्गी लागला नव्हता प्रलंबित राहिला होता. आजच्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानावे तेवढे कमी आहे असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलय.

You cannot copy content of this page