ओरोस ता.०४-:
राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्यावतीने 4 जुलै, 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर देशव्यापी मागणी दिनाच्या अनुषंगाने दुपारच्या भोजनाच्या सुट्टीत जुनी पेन्शन योजना सत्वर लागु व्हावी, पी एफ आर डी ए कायदा रद्द करावा, आठव्या वेतन आयोगाचे गठन करा, कंत्राटी व अंशकालीन कर्मचारी यांच्या सेवा नियमीत करा यांसह इतर सर्व प्रलंबित मागण्या संदर्भात घोषणा देऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निर्दशने करणेत आली.
यावेळी मागण्या मान्य न झालेस संघटने मार्फत तिव्र लढा दिला जाईल, असे संघटनेच्या वतीने जाहिर करणेत आले. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या निदर्शना मध्ये स्वयंस्फुर्तीने कर्मचारी सहभागी होते. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना कार्याध्यक्ष सत्यवान माळवे, राजन वालावलकर, सरचिटणीस सखाराम सपकाळ, कोकण विभाग सहसचिव सचिन माने, सहसचिव साईनाथ यादव , प्रमोद म्हैदरकर श्री.भिसे आदी संघटना पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
