युतीच्या माध्यमातून आंबोली गेळे कबुलायतदार गावकर प्रश्न मार्गी

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वाटले पेढे : पर्यटन वाढीला मिळणार चालना

⚡आंबोली ता.०४-: आंबोली गेळे कबुलायतदार गावकर प्रश्न मार्गी लागल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी तेथील ग्रामस्थांसह आंबोली येथील श्रीदेवी माऊलीला पेढे ठेवून आनंद साजरा केला. यावेळी राज्यातील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागला असून ग्रामस्थांच्या वतीने आपण या सर्वांचे आभार व्यक्त करतो भविष्यात या प्रश्नाच्या निकालामुळे येथील विकास कामांना तसेच पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे.

शेतकऱ्यांना आता विकासात्मक निर्णय घेताना कुठलीच अडचण येणार नाही असे सांगितले

यावेळी संजू परब, रवि मडगावकर,अजय गोंदावळे मनोज नाईक,सावेत्री पालेकर, नमीता राऊत, आत्माराम पालेकर, ज्ञानेश्वर राऊत, संतोष पालेकर,बाळा सावंत, रामा गावडे, शशिकांत गावडे, तानाजी गावडे ,राजन गावडे,शंकर चव्हाण, विलास गावडे, नारायण चव्हाण, विष्णू चव्हाण रमेश गावडे शंकर गावडे, मनोहर गावडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

You cannot copy content of this page