रवींद्र चव्हाण राजन तेली यांच्यामुळेच आंबोली कबुलायतदार प्रश्न मार्गी…

बंटी पुरोहित; केसरकर समर्थकांनी फुक्याच श्रेय घेऊ नये..

⚡सावंतवाडी ता.०४-: अनेक वर्षे प्रलंबित आंबोली-गेळे-चौकुळ कबुलायतदार प्रश्न मंत्री दीपक केसरकर यांनी सोडू शकले नाहीत ते पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वर्षभरात सोडून दाखवला त्यामुळे केसरकर समर्थकांनी उगाच फुक्याचे श्रेय घेऊ नये असा टोला युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांनी लगावला.

दरम्यान राजन तेली यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानेच हा प्रश्न सुटला असल्याचा देखील बंटी पुरोहित यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व राजन तेली यांचे आभार देखील मानले आहेत.

You cannot copy content of this page