छत्रपती शिवाजी नगर परिसरातील रस्त्यांत खड्ड्यांचे साम्राज्य

नगरपलिका प्रशासनाचे दुर्लक्ष

कुडाळ : शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातून बाजारपेठकडे जाणारा मार्ग खड्डेमय बनला आहे. हे खड्डे मागील वर्षापासून भरण्यात आलेले नाहीत. पावसाळा सुरू झाला असून या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे या खड्ड्यातून वाहने जाताना चिखलाचे पाणी नागरिकांवर उडते. तर वाहनचालकाना सुद्धा या खड्ड्यांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गावरील बल्लाळ दुकान आणि अंकुर स्पेअर पार्ट दुकान येथे मोठे खड्डे पडले आहेत. मात्र, याबाबत प्रशासन गंभीर नाही. मागील एक वर्षापासून हे खड्डे जैसे थे स्थितीत आहेत.

You cannot copy content of this page