घराला धोकादायक ठरणारा माड सुरक्षित हटविला

माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या माध्यमातून झाला प्रयत्न

मालवण (प्रतिनिधी)

मालवण शहरातील रेवतळे (परुळेकर हॉस्पिटल नजीक) येथील वायंगणकर कुटुंबीयांच्या घरावर अर्धवट तुटलेल्या स्थितीत असलेला धोकादायक माड माजी नगरसेवक दिपक पाटकर यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकाऱ्यांकडून सुरक्षित खाली उतरविण्यात आला.

रेवतळे येथे वायंगणकर कुटुंबीय राहत असलेल्या परिसरातील एक माड अर्धवट तुटून घरावर धोकादायक स्थितीत राहिलेला होता. याबाबत मदतीसाठी माजी नगरसेवक दीपक पाटकर यांना नागरिकांकडून माहिती देण्यात आली. त्यावेळी मोदी @9 अभियान अंतर्गत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सभेसाठी राजापूर येथे असलेल्या दीपक पाटकर यांनी माहिती मिळताच फोनद्वारे तात्काळ आपल्या काही सहकाऱ्यांना संपर्क केले. काही वेळातच बाबली आंब्रडकर, बाबू आंब्रडकर व सहकारी वायंगणकर यांच्या घरी पोहचले. अर्धवट तुटलेला माड सुरक्षितपणे तोडून खाली उतरला.

यावेळी भाजप युवमोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, निनाद बादेकर, भाई मांजरेकर यांचेही सहकार्य लाभले. दीपक पाटकर व भाजप पदाधिकारी यांच्या माध्यमातून वायंगणकर कुटुंबियांना दिलासा मिळाला.

You cannot copy content of this page