⚡कणकवली ता.२५-:
अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल कणकवलीला जुनियर कॉलेजचे मान्यता मिळाली असून, कॉलेज साठी इयत्ता 11 वी आणि 12 वी साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
संगीत, नृत्य, तायक्वांदो, तबला या कलांसाठी ही शाळा गेली 22 वर्षे मार्गदर्शन करत आहे . इयत्ता 11 वी आणि 12 वी कला, वाणिज्य, विज्ञान या शाखेत विद्यार्थ्यांना प्रवेश घेतल्यानंतर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त JEE, NEET, परदेशी भाषा, लष्कर प्रशिक्षण यावर भर दिला जाणार आहे.
अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी विद्यार्थ्यांनी 11 वी आणि 12 वी साठी प्रवेश घ्यावा, तसेच प्रत्येक विद्यार्थी योद्धा घडावा म्हणून ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांवर मेहनत घेण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
आता ज्युनिअर कॉलेजची मान्यता मिळाल्यामुळे, स्कूलचे नाव बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल अँड जुनियर कॉलेज असे होणार असल्याची माहिती शाळेच्या सचिव सौ. सुलेखा रमेश राणे मॅडम यांनी दिली आहे. त्याला संस्थेचे संचालक संदीप सावंत, अभिजीत सावंत संस्थेचे सदस्य विनायक सापळे, सौ. प्रणाली सावंत यांनी याला सहमती दर्शवली.
अधिक माहितीसाठी 784183196/ 9168340403
9820725989/ 9404940217
या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
