हायस्कूलच्या १९९३-९४ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने राबविण्यात आला उपक्रम*
⚡सावंतवाडी ता.२५-: येथील आरपीडी हायस्कूलच्या १९९३-९४ बॅचच्या माजी विद्यार्थी आणि मुंबई येथील आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक गावडे आणि त्यांचे शालेय जीवनातील सहकारी सुनील नाईक, संजय सावंत, सुरेश गवस यांच्यावतीने आरपीडी हायस्कूलच्या गरजू व गरीब मुलींना गणवेश वाटप करण्यात आले.
गणवेश वाटपाचा हा कार्यक्रम १९९३-९४ बॅचच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष पद्मराज मुणगेकर यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी माजी विद्यार्थी किरण पालव संदीप सामंत, नारायण घाटकर, शाळेचे प्राचार्य धोंड सर, उपमुख्याध्यापक साळगावकर सर आदी मान्यवर उपस्थित होते. हा उपक्रम राबविल्याबद्दल शाळेतर्फे या बॅचचे धोंड सर यांनी गणवेश वाटपाबद्दल आभार व्यक्त केले.
