वैभववाडी येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव

⚡वैभववाडी ता.२३-: वैभववाडीच्या नगराध्यक्षा नेहा माईणकर व नगरपंचायत यांच्या वतीने विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कणकवली, देवगड व वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित् येथील भाजपा कार्यालयात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दहावी व बारावी मध्ये तालुक्यात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थी तसेच तालुक्यातील एकूण 17 माध्यमिक विद्यालयातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव यावेळी करण्यात आला. जवळपास 100 विद्यार्थ्यांना छत्री, पेन ड्राईव्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी प्रमोद जठार म्हणाले, गुणवंत विद्यार्थ्यांनी पाय जागेवर ठेवून वाटचाल केली पाहिजे. समाज व शाळेचे उपकार कोणीही विसरता कामा नये. गुणवत्तेत मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या सोबत घेऊन वाटचाल करा. शिक्षणासाठी आई-वडिलांनी घेतलेली मेहनत कधीही विसरू नका असे सांगितले. नेहा माईणकर, नासीर काझी, भालचंद्र साठे, सुधीर नकाशे अरविंद रावराणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजपा पदाधिकारी, उपनगराध्यक्ष, सभापती, उपसभापती, माजी सभापती, नगरसेवक शक्ती केंद्रप्रमुख बुथ अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बाळा हरयाण यांनी मानले.

शुक्रवार दि. 23 जून रोजी सकाळी 11 वाजता येथील भाजपा कार्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला आमदार नितेश राणे, वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी उपस्थित राहणार आहेत.

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गावागावात भाजपातर्फे वृक्षारोपण, रुग्णांना फळे वाटप व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आदी कार्यक्रम पार पडणार आहेत.

नगराध्यक्षा नेहा माईणकर यांनी तालुक्यात विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम राबविले आहेत. याहीवर्षी आमदार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी व पालक यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन नेहा माईणकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page