⚡मालवण ता.२३-: नगर वाचन मंदिर, मालवण आणि नारिग्रेकर कुटुंबिय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी परिक्षेमध्ये सेमी इंग्लिश माध्यमातून संपुर्ण संस्कृत विषय घेऊन मालवण तालुक्यातील केंद्रातून प्रथम आलेल्या चार विद्यार्थी व चार विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती स्वरूपात प्रोत्साहनपर निधी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
यावर्षी संपूर्ण संस्कृत हा विषय घेऊन या विषयात प्रथम क्रमांक कु. धनश्री सखाराम शेटवे (९७%), कु. हितेश आनंद मालडकर (९६.६०% ). व्दितीय क्रमांक कु. वैभवी विद्याधर मेस्त्री ( ९६.४०%). कु. श्रेयस बहू राठोड ( ९६.२०%), तृतीय क्रमांक कु. सानिया संदिप आजगावकर (९५.२०%), कु. यश मिलींद कदम ( ९५%), चतुर्थ क्रमांक कु. एंजल मंगेश गोसावी ( ९४.४०%) आणि कु. हरिओम संजय प्रसाद ( ९३.४०%), या विद्यार्थी विद्यार्थीनींची निवड या शिष्यवृत्तीसाठी करण्यात आलेली आहे. या विद्यार्थी, विद्यार्थीनीना अनुक्रमे रु. १०,०००, रु. ५,०००, रु.३,०००, रू.२,००० याप्रमाणे प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. हा शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम रविवार दि. २ जुलै २०१३ रोजी सकाळी १०.३० वाजता ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला पालक, शिक्षक व नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नगर वाचन मंदिरचे उपाध्यक्ष उदयराव मोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
