⚡वैभववाडी ता.२३-: कणकवली – वैभववाडी – देवगड चे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस सर्वत्र विविध उपक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात अनेक संस्था, मित्रमंडळे यांच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर वैभववाडी येथे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या अर्जुन रावराणे विद्यालय, कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल च्या वतीने महाविद्यालयाच्या प्रांगणात संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
बहरत जाणाऱ्या वृक्षांप्रमाणे आमदार नितेश राणे यांना उदंड आयुष्य लाभो व लवकरच विस्तार होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागो अशी इच्छा यावेळी रावराणे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि प्रशालेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
