⚡कुडाळ ता.२१-: उद्यानविद्या महाविद्यालय-मुळदे येथे आज जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, भाजपा जेष्ठ नेते राजू राऊळ, युवा मोर्चा अध्यक्ष कुडाळ रुपेश कानडे, ओरोस मंडल अध्यक्ष पप्या तवटे, ओरोस मंडल सरचिटणीस देवेंद्र सामंत, योग प्रशिक्षक डॉ. नवांगुळ, योगशिक्षिका सामंत, शरावती शेट्टी, उद्यानविद्या महाविद्यालय प्राचार्य हळदीकर, प्राध्यापक नितीन सावंत व विध्यार्थी वर्ग उपस्थित होता. यावेळी योग प्रशिक्षक डॉ. नवांगुळ यांनी विद्यार्थ्यांना आजच्या काळातील योगाचे महत्त्व पटवून दिले. तसेच योग प्रकारांची माहिती दिली.
