‘हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग’ चे आयोजन
⚡वेंगुर्ला ता.२१-: येथील रा. कृ. पाटकर हायस्कूमध्ये ‘हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग’ या संस्थेच्या वतीने आज बुधवार दि २१ जून २०२३ रोजी सकाळी ९.०० ते १२.०० या वेळेत येथील विद्यार्थी,शिक्षक व पालकांसाठी ‘नेत्र तपासणी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कोविडच्या जागतिक महामारीत सर्वच व्यवस्था बंद होत्या,त्यात शाळा – कॉलेजही बंद होती,त्यावेळी ऑनलाईन शिक्षणामुळे नाईलाजाने विद्यार्थ्यांना मोबाईल देऊ देणे पालकांना बंधनकारक झाले.
याचा दूरगामी परिणाम मुलांच्या डोळ्यावर होऊ शकतो,नेमकी हीच बाब विचारात घेऊन ‘हातभार चॅरिटेबल ट्रस्ट’ सिंधुदुर्ग या संस्थेच्या माध्यमातून आज ‘योग दिवस’ चे औचित्य साधून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा – कॉलेजमधील विद्यार्थ्यांची मोफत ‘नेत्र तपासणी’ करून ‘हातभार चॅरिटेबल ट्रस्ट’ सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष संजय पिळणकर व संस्थापक अध्यक्ष शैलेश मयेकर यांनी सांगितले.
