⚡कुडाळ ता.२१-: आज जागतिक योग दिन साजरा होत आहे. यानिमित्त कुडाळ शहरातील प्रसिद्ध पडतेवाडी शाळेत योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कुडाळच्या नगरसेविका प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर यांची मुख्य उपस्थिती होती. यावेळी मुलांना योगाचे आपल्या जीवनातील महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच मुलांना योगाचे वेगवेगळे प्रकार शिकविण्यात आले. यावेळी पडतेवाडी शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होता.
