रुपेश राऊळ यांचा मंत्री केसरकर यांना इशारा;बॅनर बाजीच्या माध्यमातून खोक्याचा असर दिसू लागल्याचा टोलाही लगावला
⚡सावंतवाडी ता.२०-: ठाकरे गटात असताना शहरात एवढे बॅरबाजी मेळावे झालेले आम्ही केव्हाच पाहिले नाही. मात्र आता हे बॅनरबाजी मेळावे कुठल्या जोरावर होत आहेत. खोख्याचा तर असर नाही ना..? असा प्रश्न ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केला.
दरम्यान उद्धव ठाकरेंशी गद्दारी केलेल्यांचा येणाऱ्या विधनासभा निवडणूकीत परभाव करून आमच्या उमेदवाराला निवडून आणू. त्यांना मातोश्रीवर वाजत गाजत घेऊन जाणार असल्याचे ही राऊळ यावेळी बोलतानाच म्हणाले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
