मायकल डिसोझा:वर्षभरात कुठचे विकासकाम केले ते जाहीर करण्याचे केले आवाहन
⚡सावंतवाडी ता.२०-: खासदार विनायक राऊत यांचा पराभव करणार अशी भाषा करणाऱ्या केसरकर यांनी आमदारकी सोडावी व साध्या नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवावी. आमचा साधा शिवसैनिक त्यांचा पराभव करेल, असा टोला माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी आज येथे लगावला.
दरम्यान, सावंतवाडी शहरात आपला दवाखाना सुरू केला. मात्र अद्याप त्या ठिकाणी डॉक्टरच नाहीत. ही जनतेची चेष्टा आहे, तर गेल्या वर्षभरात त्यांनी कुठचे विकास कामे केले, हे देखील त्यांनी जाहीर करावे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.