पायी चालणेही बनले मुश्किल ः अपघातांच्या प्रमाणात वाढ
⚡बांदा ता.१९-: मडुरा माऊली मंदिर पुलाच्या दुतर्फा चिखलाचे साम्राज्य झाले असून पाच पेक्षा जास्त अपघात झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ खडीकरण करून त्यावर क्रश टाकत धन्यता मानली. मात्र येथून ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थी, नागरिकांसह वाहनचालकांना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे.
विशेष म्हणजे हलकासा पाऊस पडला तर पायी चालणेही मुश्किल बनले आहे. नवीन पुलासाठी उपोषण छेडले आता चिखलासाठी पुन्हा उपोषण छेडावे लागेल का असा सवाल करत, तात्काळ यावर उपाययोजना करावी अशी मागणी शिवसेना उपविभागप्रमुख तथा मडुरा माजी उपसरपंच उल्हास परब यांनी प्रशासनाकडे केली आहे.
