Headlines

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वस्तीची बस सुरू करा…

अनिल चव्हाण: एस टी प्रशासनाकडे मागणी..

आंबोली,ता.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वस्तीची बस सुरू करावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी एस टी प्रशासनाकडे केली आहे.

आंबोली येथील विद्यार्थी सावंतवाडीत शिक्षणासाठी येतात त्यांच्यासाठी वस्तीची बस सोडण्यात यावी.सध्या बस नसल्याने विद्यार्थ्यांच्या तासिका चुकत आहेत त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे.

याबाबत व्यवस्थापक सुनील प्रभू यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी वरिष्ठांना याबाबत सूचित करून लवकरच बस सुरू करू असे आश्वासन दिले.पालकांनी बस सुरू नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.तात्काळ बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने अनिल चव्हाण यांनी केली आहे.

You cannot copy content of this page