कर्नाटक प्रभारी यांच्या उपस्थितीत पार पडली भाजपची टिफीन बैठक

माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले निर्मल सुराणा यांचे स्वागत

सावंतवाडी ता.१८- : मोदी @ 9 उपक्रमांतर्गत सावंतवाडीत आज भाजप तर्फे टिफीन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीला कर्नाटक भाजप प्रभारी निर्मलजी सुराणा यांच्या उपस्थितीत प्रथम जिल्ह्यात सावंतवाडी येथे टिफिन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांनी केलेल्या ९ वर्षाच्या कार्यकाळातील विविध योजनांचा माहिती देण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी निर्मलाजी सुराणा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

दरम्यान नऊ वर्षातील केलेल्या जनहिताच्या योजना तळागाळा पोहोचण्याबरोबर शेवटच्या व्यक्तींपर्यंत कशा पोहोचतील याबाबत सुराणा यांनी मार्गदर्शन केले तसेच आगामी काळात होणाऱ्या अभियाना संदर्भात देखील चर्चा करण्यात आली.

यावेळी युवराज लखमराजे भोंसले, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, बाळू देसाई, आनंद नेवगी, मोहिनी मडगावकर, बंटी पुरोहित, विनोद सावंत, दिलीप भालेकर, सत्यवान बांदेकर, सचिन साटेलकर मिथिलेश सुकी ,प्रफुल गोंदावळे परीक्षेत मांजरेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page